News Flash

तुम्हाला माझी गरज नाही, हा चित्रपट सुपरहिट आहे- सलमान खान

या सिनेमासाठी तुम्हाला माझी गरज नाही, हा सिनेमा सुपरहिट आहे, असे सलमान म्हणाला.

सलमान खान बॉलीवूडमधील तीन खान पैकी एक खान…. या सलमानसाठी लाखो तरुणी आजही घायाळ होतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांचा लाडका असलेला सलमान खान याने राकेश बापट या अभिनेत्याला शाबासकीची थाप दिली आहे. हिंदी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा राकेश बापट सध्या खूप खुश आहे. जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेल्या वृंदावन सिनेमात राकेश मुख्य भूमिका साकारत आहे.  राकेशची ही पहिलीच अॅक्शन फिल्म असून सुपरस्टार  सलमान खान यानेही राकेशच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मुळातच वृंदावन सिनेमाची टीम ही साउथ बॅकग्राउंड असल्याने हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक नामवंत कलाकारांना दाखवण्यात आली. यामध्ये रोहित शेट्टी, सलमान खान यांचाही समावेश होता. हा सिनेमा पाहिल्यानंतर या सिनेमासाठी तुम्हाला माझी गरज नाही, हा सिनेमा सुपरहिट आहे, अशी  प्रतिक्रिया सलमानने  दिली. ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर ह्या  तिघांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
rakesh-bapat

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 1:19 pm

Web Title: salman khan praise the work of rakesh bapat
टॅग : Salman Khan
Next Stories
1 ‘राक्षस’ लवकरच येतोय..
2 सिद्धार्थ सांगतोय पोलिसांच्या व्यथा
3 सदाशिव अमरापूरकर यांचा ‘धनगरवाडय़ा’त ‘झिमू’!
Just Now!
X