19 January 2020

News Flash

सलमान म्हणतोय,”आलिया माझ्यापेक्षा जास्त प्रतिभावंत कलाकार”

ईदच्या दिवशी सलमानचा 'भारत' प्रदर्शित होणार असून भारतसोबतच सलमानच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का आहे

सलमान आणि आलिया

सलमान खानच्या चित्रपटांची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा असते. त्यातूनही जर चित्रपट ईद, दिवाळी, ख्रिसमस अशा सणांना प्रदर्शित होणार असेल तर त्याची चर्चा अधिक असते. ५ जूनला म्हणजेच ईदच्या दिवशी सलमानचा ‘भारत’ प्रदर्शित होणार असून, सलमानचे चाहते आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आहे.

भारतसोबतच सलमानच्या चाहत्यांना अजून एक सुखद धक्का आहे.लवकरच सलमान संजय लीला भन्साळींसोबत एक नवीन प्रोजेक्ट करणार असून त्यामध्ये सलमानसोबत आलिया भट्ट काम करणार आहे. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला की, “मी आणि संजय खूप वर्षांनी एकत्र आलो असलो तरीही आमचं नातं तसंच आहे. आम्ही बरीच वर्षे एकत्र काम केलं नाहीये म्हणूनच आम्ही एक गोड प्रेमकथा घेऊन येणार आहोत.” या चित्रपटात सलमान आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

सलमान खान आलिया भट्टसोबत काम करणार आहे ही गोष्ट सुद्धा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी आहे. सलमानने आलियाचे खूप कौतुक केले आहे. तो म्हणाला की, “विद्यार्थिनीपासून एका कुशल अभिनेत्रींपर्यंतचा तिचा प्रवास सुंदर आहे. स्वतः आलिया सोडून हे श्रेय कोणीच घेऊ शकत नाही. ही आलियाचीच मेहनत आहे. जे म्हणतात की,आम्ही आलियाला घडवलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. आलिया खूप जास्त गुणवान आहे. त्यामानाने माझ्याकडे काहीच कला,प्रतिभा नाहीये,’ असं सलमान हसत हसत म्हणाला.

सध्या सलमान खान अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ५ जून २०१९ साली हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.’भारत’नंतर सलमान सोनाक्षी सिन्हासोबत ‘दबंग ३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

First Published on May 22, 2019 5:21 pm

Web Title: salman khan praises alia bhatt
Next Stories
1 एक ट्विट अन् विवेकनं सलमानलाही टाकलं मागे
2 इम्रान खानच्या घटस्फोटाच्या बातमीवर सासू म्हणते..
3 ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये शाहरुख खान ?
Just Now!
X