News Flash

सलमानच्या तोंडून ऐश्वर्याची तारीफ

‘ए दिल है मुश्कील’चा ‘टीझर’ प्रदर्शित झाल्यापासून ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली

करण जोहर दिग्दíशत ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाचा टीझर प्रदíशत झाल्यापासून ऐश्वर्या बच्चन-रायचीच जास्त चर्चा होते आहे. रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्यातील प्रणयदृश्ये या चित्रपटासाठीचा आकर्षणाचा विषय ठरणार आहे. ऐश्वर्या या चित्रपटात अतिशय सुंदर दिसणार आहे, अशी चर्चा आतापासूनच होत असून चित्रपटाच्या ‘टीझर’मध्ये त्याची झलकही दिसली आहे. त्यामुळे या माजी विश्वसुंदरीच्या सौंदर्याचे दीवाने असलेले पुन्हा एकदा तिच्या रूपाचे गोडवे गाऊ लागले आहेत. अर्थात याला सलमान खानही अपवाद नाहीच!

‘ए दिल है मुश्कील’चा ‘टीझर’ प्रदर्शित झाल्यापासून ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली आणि ती सलमानच्या कानापर्यंतही पोहोचली; परंतु व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला हा ‘टीझर’ पाहता आला नाही. तरीही उसंत मिळताच त्याने हा ‘टीझर’ पाहिला. एके काळी ऐश्वर्यावर जिवापाड प्रेम करणारा सलमान खान पुन्हा एकदा हा टीझर पाहिल्यानंतर तिच्याकडे पाहतच राहिला, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. ‘ती किती सुंदर दिसतेय..’ असे उद्गारही सलमानच्या तोंडून बाहेर पडल्याचे समजते. अर्थात हे उद्गार नेमके कोणासाठी होते, हे उघड झालेले नाही. कारण या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे. सलमानने तिच्यासोबतही काम केले आहे. परंतु तरीही ऐश्वर्याबद्दल त्याच्या मनात आजही एक खास कोपरा आहे. त्यामुळेच सलमानचा रोख ऐश्वर्याकडेच होता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 6:15 am

Web Title: salman khan praising ex girlfriend aishwarya rai bachchan
Next Stories
1 आशाताईंच्या काश्मिरी गीतांना ‘सुवर्ण’ झळाळी
2 Sonali Kulkarni:’माझा बाप्पा माझ्यासारखा एकटा होता’
3 ‘बाप्पा सोन्या चांदीचा भुकेला नाही’
Just Now!
X