News Flash

एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती अत्यंत नाजूक; सलमाननं केलं ट्वीट, म्हणाला…

एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा खालावली

प्रसिद्ध गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा खालावली असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बालसुब्रमण्यम यांनी करोनावर मात केली होती. मात्र, अद्यापही त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे सध्या ते लाइफ सपोर्टवर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी सर्वांकडूनच प्रार्थना करण्यात येत आहेत. बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान यानंदेखील त्यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. त्यानं बालसुब्रमण्यम यांच्यासाठी एक ट्वीटही केलं आहे. याव्यतिरिक्त गुरूवारी रात्री अभिनेते कमल हसन यांनीदेखील रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.

“बालसुब्रमण्यम सर तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही माझ्यासाठी गायलेल्या सर्वच गाण्यांसाठी तुमचे खुप आभार तुम्ही मला नक्कीच खास बनवलं आहेत. तुमच्यासाठी खुप सारं प्रेम,” असं ट्वीट सलमाननं केलं आहे. बालसुब्रमण्यम यांनी सलमानसाठी ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यांसारखी अनेक गाणी गायली होती.

बालसुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर योग्य उपचार घेतल्यामुळे त्यांनी करोनावर मात केली. याविषयी त्यांच्या मुलाने एसपी चरण यांनी माहिती दिली होती. मात्र, आता बालसुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यामुळे त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. याविषयी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत याविषयीची माहिती देण्यात आली. “गेल्या २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. म्हणूनच त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यता आलं आहे. तसंच तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत”, असं रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:07 pm

Web Title: salman khan prays for speedy recovery of sp balasubramanian says from the bottom of heart twitter songs jud 87
Next Stories
1 ड्रग्स प्रकरण : रकुल प्रीत पाठोपाठ करिश्मा प्रकाशही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल
2 ‘हॉण्टेड 3D’फेम अभिनेत्रीने केली ड्रग्स टेस्ट; रिपोर्ट आल्यावर म्हणाली…
3 ‘इश्क में मरजावां 2’फेम अभिनेता करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X