गेल्या आठवड्यात सलमान खानचा बहुचर्चित ‘रेस ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. खर तर गेल्या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार खिल्ली उडवण्यात आली होती. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच ट्रोल झालेल्या या चित्रपटाला कदाचित प्रेक्षकांची पसंती लाभणार नाही असंच वाटत होतं. पण या चित्रपटानं अनेक विक्रम मोडले आहेत.

दरवर्षी ईदला चित्रपट प्रदर्शित करण्याचा सलमानचा फंडा यावेळीही यशस्वी ठरला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर सलमानच्या चित्रपटानं कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत हे विक्रम कोणते ते पाहू.

१. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कामाई करणारा चित्रपट
‘रेस ३’ हा २०१८ मधला पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘रेस ३’ नं पहिल्याच दिवशी २९ कोटींचा गल्ला जमावला होता.

२. ‘रेस’ आणि ‘रेस २’ पेक्षा सर्वाधिक कमाई
या चित्रपटानं ‘रेस’ आणि ‘रेस २’ च्या कामाईचे रेकॉर्डही मोडले आहेत. ‘रेस २’ ची एकूण कमाई ही १०० कोटी होती तर ‘रेस ३’ नं पहिल्या तीन दिवसांत या दोन्ही चित्रपटांपेक्षा सर्वाधिक कमाई केली आहे.

३. तीन दिवसांत १०० कोटींची विक्रमी कमाई
‘रेस ३’ नं केवळ तीन दिवसांत १०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. रविवारी या चित्रपटानं दोन दिवसांच्या तुलनेत बक्कळ कामाई करत १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

४. जगभरातील सिनेमागृहातही सर्वाधिक कमाई
फक्त भारतातच नाही तर जगभरातील अनेक चित्रपटगृहात ‘रेस ३’ प्रदर्शित झाला. जगभरातील चित्रपटगृहातून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद लाभला. अमेरिकेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.१ कोटी, ऑस्ट्रेलियामध्ये ७० लाख आणि न्यूझीलंडमध्ये ४७ लाखांचा गल्ला जमवला आहे.

५. विकेंडला सर्वाधिक कमाई
‘रेस ३’ हा ‘पद्मावत’नंतर विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.