News Flash

Video : घोड्यासोबत ‘दबंग’ खानची रेस

सोशल मीडियावर सलमानचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सलमान खान

सुपरहिट चित्रपट असो, त्या चित्रपटांची बॉक्स ऑफीस कमाई असो या सर्वांची शर्यत बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमानने जिंकली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यानंतर आता आणखी एक अनोखी रेस सलमानने जिंकली आहे. चक्क घोड्यासोबत त्याने शर्यत लावली आहे.

सोशल मीडियावर सलमानचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये तो घोड्यासोबत शर्यत लावताना दिसत आहे. विशेष म्हणजे घोड्याच्याही काही क्षण आधी सीमारेषा गाठून सलमान ही रेस जिंकतो. व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटातील गाणं ऐकू येतं. हा व्हिडिओ एखाद्या शूटिंगदरम्यानचा असावा असा अंदाज लावण्यात येत आहे.

Bigg Boss Marathi : ‘हुकूमशहा’ नंदकिशोरविरोधात प्रजा पुकारणार बंड

बॉलिवूडच्या रेसमध्येही सलमानचंच निर्विवाद वर्चस्व असून त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रेस ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईत १०० कोटींचा आकडा पार केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 5:50 pm

Web Title: salman khan race with horse watch this video
Next Stories
1 ‘३ इडियट्स’मध्ये आमिरची जागा घेणार रणबीर?
2 हायकोर्टानं कामसूत्राचा दाखला देत स्तनपानाच्या फोटोविरोधातील याचिका फेटाळली
3 Video : ‘धडक है ना’वर थिरकले इशान-जान्हवी
Just Now!
X