X
X

प्रदर्शनापूर्वीच ‘रेस ३’ची झाली कोट्यावधींची कमाई !

READ IN APP

आतापर्यंत या चित्रपटातील प्रत्येक गाणी सुपरहिट ठरली असून त्याला मोठ्या प्रमाणावर व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत.

बॉलिवूडचा ‘दबंग’ खान अर्थात सलमान खानचा ‘रेस ३’ चित्रपट उद्या (शुक्रवारी) प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘रेस ३’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलाच गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटातील प्रत्येक गाणी सुपरहिट ठरली असून त्याला मोठ्या प्रमाणावर व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत.

‘रेस ३’ चं प्रदर्शन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांच्या नजरा १५ तारखेकडे लागल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर, टीझर ज्या पद्धतीने गाजत आहे त्यावरुन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करणार असं दिसून येत आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कोट्यावधीची कमाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

‘रेस ३’ सलमानने रमेश तौरानींसह केला असून या चित्रपटाचे सॅटलाईट राइट्स एका टीव्ही नेटवर्कने खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे ‘रेस ३’ तयार करण्यासाठी जी रक्कम लागली होती. तेवढ्याच रक्कमेला या सॅटलाईट राइटसची विक्री झाली आहे.  त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला दुपट्टीने नफा मिळणार आहे.

‘रेस ३’चे सॅटलाईट राइट्सची खरेदी करण्यासाठी सलमानला १३० कोटी रुपयांची रक्कम मिळाली असून सलमानने या कंपनीसह केलेला हा दुसरा करार आहे. यापूर्वी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठीदेखील सलमानने या नेटवर्कबरोबर करार केला होता.

दरम्यान, १३० कोटी रुपयांची रक्कम आकारुन सलमानने सध्या सॅटलाईट अधिकार मिळविण्यामध्ये अग्रक्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटामध्ये जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेझी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

 

22
X