सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडच्या भाईजानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजेच मे महिन्याच्या 14 तारखेला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे.

सलमान खानने सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर तुफान व्हायरल होताना दिसतंय. तर सलमानच्या चाहत्यांची उत्सुकता आता ताणली गेलीय. या पोस्टरला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय.

‘राधे’ सिनेमाच्या पोस्टरमध्ये सलमानचा दंबग अंदाज पाहायला मिळतोय. सलमान खानने हे पोस्टर शेअर करत चाहत्यांसाठी एक कॅप्शन दिलंय. ” ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असं खास कॅप्शन त्यानं दिलंय. चाहत्यांना दिलेलं वचन पाळत असल्याचं त्यानं या कमेंटमधून सांगितलं आहे.

सलमान खानच्या सिनेमासाठी चाहत्यांमध्ये कायमच आतूरता पाहायला मिळते. या सिनेमात सलमान सोबत अभिनेत्री दिशा पटानी झळकणार आहे. याचसोबत या सिनेमात रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभू देवाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

येत्या काळात सलमान ‘टाइगर 3’, ‘किक 2’ आणि ‘कभी ‘ईद कभी दीवाली’ या सिनेमातून झळकणार आहे. तसंच किंग खानच्या ‘पठाण’ या सिनेमात सलमान पाहुण्या कलाकालाच्या भूमिकेत दिसणार आहे.