News Flash

सलमानच्या ‘सिटी मार’ गाण्याने २४ तासात तोडले अनेक रेकॉर्ड

राधे चित्रपटातील हे गाणे कालच प्रदर्शित झाले..

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’चा २६ एप्रिल रोजी ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेत होता. त्यानंतर या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे प्रदर्शित झाले. आता २४ तासांमध्ये गाण्याने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत.

दर्शकांकडून मिळणाऱ्या अभूतपूर्व प्रतिक्रियांसोबत, ‘सिटी मार’ने आपल्या प्रदर्शनाच्या अवघ्या 24 तासातच जवळपास सगळे रेकॉर्ड तोडून टाकले. या गाण्याने सर्वच मंचावर 30 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला असून 24 तासात जगभरातील सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे ठरले आहे. प्रदर्शनानंतर काही वेळातच, हे गाणे ट्विटरवर ट्रेंड झाले होते. तसचे ‘सिटी मार’ या गाण्याला यूट्यूबवर 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. इतक्या कमी वेळात यूट्यूबवर 2 लाख लाइक्स मिळणारे हे बॉलिवूडमधील पहिले गाणे ठरले आहे.

सलमानचे हे गाणे कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंक चिका’ तयार केला होता. या गाण्यात जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाची निर्मिती प्रभु देवाने केली आहे. या चित्रपटात सलमान एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता अखेर हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 2:34 pm

Web Title: salman khan radhe movie new song siti mar set new record avb 95
Next Stories
1 ‘आज त्याचे लग्न झाले असून…’, संजय दत्तच्या मुलीने एक्स बॉयफ्रेंड विषयी केला खुलासा
2 अमेरिकेच्या राष्ट्रपतींना ‘देसी गर्ल’ प्रियांका म्हणाली….
3 ‘लोकं उपाशी मरतायेत आणि…’, काजोलचा व्हिडीओ पाहून संतापले यूजर्स
Just Now!
X