News Flash

सलमानचा ‘राधे’ पाहण्यासाठी लाखो चाहत्यांची झुंबड, Zee5चं सर्व्हर क्रॅश

आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट आज ईदला प्रदर्शित करण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण एकाच वेळी लाखो चाहते चित्रपट पाहात असल्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मचा सर्व्हर क्रॅश झाला आहे.

सलमान खानचा चित्रपट म्हटलं की चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे सर्वजण ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात होते. गुरुवारी सलमानचा हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित होताच लाखो चाहते एकाच वेळी चित्रपट पाहू लागले. त्यामुळे सर्व्हर क्रॅश झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 Premium (@zee5premium)

सर्वर क्रॅश झाल्यामुळे ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ चित्रपट पाहाता येत नसल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली होती. जवळपास एक तासानंतर अॅप पुन्हा सुरु झाले.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कालाकार दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 6:17 pm

Web Title: salman khan radhe your most wanted bhai release on zee5 server crashes after viewers watch film avb 95
Next Stories
1 सुपरस्टार रजनीकांतनी घेतली करोना लस; मुलगी म्हणाली, “करोनाला हरवूया…!”
2 गंगा नदीतील मृतदेह पाहून परिणीती आणि फरहान संतापले; म्हणाले “राक्षस”
3 रेमडेसिवीर नाही तर इथं मिळतय रेमो डिसूझा इंजेक्शन, कोरिओग्राफरने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Just Now!
X