15 October 2019

News Flash

सलमानने कोणतेही घर दिलेले नाही – रानू मंडल

सलमानने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही.

गायीका रानू मंडल कधीकाळी रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या. परंतु व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. त्यांना हिमेश रेशमिया सारख्या प्रख्यात कलाकाराबरोबर गाण्याची संधी मिळाली. चहु बाजूंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान बॉलिवुडचा भाईजान सलमान खान याने रानू मंडल यांना घर देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. रानू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने मला घर दिले नाही, अशी माहिती दिली.

रानू मंडल यांनी गायलेले तेरी मेरी कहानी हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ माजवला होता. दरम्यान गरजूंचा तारणहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानने रानू मंडल यांना तब्बल ५५ लाखांचे घर देऊ केल्या अफवा पसरल्या होत्या. परंतु या अफवांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही तसेच मला सलमानने घर दिलेले नाही अशी कबूली स्वत: रानू मंडल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली.

काय म्हणाल्या रानू मंडल?

“सलमान खानकडे भरपूर संपत्ती आहे, या संपत्तीचा वापर तो गरीबांची मदत करण्यासाठी करतो. परंतु अद्याप त्याने मला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. माणसाचे काय तो काहीही बोलू शकतो. सलमानने ५५ लाखांचे घर दिल्याच्या बातम्या मी देखील ऐकल्या आहेत. परंतु त्या अफवा आहेत.” अशा शब्दात रानू मंडल यांनी घराबाबत झालेला गोंधळ दूर केला.

First Published on September 21, 2019 1:47 pm

Web Title: salman khan ranu mondal rs 55 lakh house mppg 94