23 October 2020

News Flash

‘अरे हे काय घातले आहे?’; रणवीरचा ड्रेस पाहून सलमानची रिअ‍ॅक्शन

रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या जोडगोळीने आयफा पुरस्कार गाजवला.

बॉलिवूड सिनेसृष्टीत सध्या आयफा (NEXA IIFA Awards 2019) पुरस्कारांची जोरदार चर्चा आहे. नुकताच पार पडलेला हा पुरस्कार सोहळा रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या जोडगोळीने विशेष गाजवला. IIFA पुरस्कार सोहळ्यात त्यांनी परिधान केलेले विचित्र कपडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. सोशल मीडियावर सध्या त्यांच्याच कपड्यांची चर्चा आहे. दरम्यान सलमान खानने देखील रणवीरची त्याच्या विचित्र कपड्यांवरुन फिरकी घेतली.

रणवीरने राखाडी रंगाचा कोट व काळ्या रंगाचे गमबूट घातले होते. या कपड्यांवर त्याने लाल रंगाचा एक कपडा घेतला होता. त्याने परिधान केलेला हा पोशाख पाहून सलमान खानचे हसू आवरले नाही. त्याने रणविरची खिल्ली उडवत चक्क त्याच्या कपड्यांनी आपले तोंड पुसले. हा अचंबित करणारा प्रकार पाहून सभागृहातील सर्वच कलाकार जोरजोरात हसू लागले. रणवीरने देखील हसता हसता सलमानच्या विनोद बुद्धीला दाद दिली. तसेच या क्षणाची क्षणचित्रे त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.

आणखी वाचा : Photo : आयफा अ‍ॅवॉर्डमधील ‘या’ तरुणीमुळे होते सलमानची चर्चा

रणवीर बरोबरच त्याची पत्नी दीपिका पादुकोण देखील आपल्या विचित्र पक्रारच्या कपड्यांमुळे चर्चेत राहिली. तिने जांभळ्या रंगाचा एक लांबलक पोशाख परिधान केला होता. हा पोशाख इतका लांबलचक होता की रणवीर सिंग त्याला उचलून दीपिकामागे चालत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 1:47 pm

Web Title: salman khan ranveer singh outfit deepika padukone mppg 94
Next Stories
1 …म्हणून बिग बींना ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’मध्ये घेतलं; दिग्दर्शकाने केला खुलासा
2 अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलिसांचा तपास सुरु
3 ट्रेनची चेन खेचल्याप्रकरणी सनी देओल, करिश्मावर आरोप निश्चित
Just Now!
X