News Flash

प्रियांकानं दिलेला दगा विसरणं अशक्य, सलमाननं एकत्र काम करण्यास दिला नकार

प्रियांकाचं अव्यवहारिक वागणं सलमानला अजिबात रुचलं नव्हतं. त्याने जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली होती.

सलमान खान, प्रियांका चोप्रा

बॉलिवूडच्या ‘भाईजान’शी पंगा घेऊ नका असं म्हटलं जातं. सलमान खान अनेक कलाकारांसाठी या इंडस्ट्रीतला ‘गॉडफादर’ आहे. त्याच्याशी पंगा घेणं अनेकांना न परवड्यासारखं त्यामुळे त्याच्या वाकड्यात जाण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्राला सलमानच्या चित्रपटाला ऐनवेळी नकार देणं चांगलंच महागात पडलं आहे. प्रियांकाने सलमानचा राग घालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात सलमानने प्रियांकासोबत काम करण्यास नकार दिल्याचं समजतंय.

भन्साळींनी नुकतंच ‘गंगुबाई’ या चित्रपटाच्या नावाची नोंदणी केली आहे. यामध्ये सलमान खानची मुख्य भूमिका आहे. तर नायिकेसाठी भन्साळींनी प्रियांका चोप्राचा विचार केला आहे. मात्र सलमानने तिच्यासोबत काम करण्यास साफ नकार दिल्याचं समजतंय. यामागचं कारण म्हणजे प्रियांकाने सलमानच्या ‘भारत’ चित्रपटासाठी दगा दिला होता. ऐनवेळी ‘भारत’ चित्रपटाला नकार देत तिनं सलमानला डच्चू दिला होता. त्यामुळे चित्रीकरणाच्या एक आठवड्याआधी त्याच्यावर नवी नायिका शोधण्याची वेळ आली होती. प्रियांकाचं अव्यवहारिक वागणं सलमानला अजिबात रुचलं नव्हतं. त्याने जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली होती. तसंच तिच्यासोबत कधीच काम न करण्याचा निर्णयदेखील घेतला होता.

वाचा : या अभिनेत्रीला तैमुरसोबत जायचंय डेटवर 

भाईजान अद्यापही हा प्रसंग विसरलेला नाही. त्याचमुळे प्रियंकासोबत पुन्हा काम करण्याची त्याची इच्छा नाही. अर्थात देसी गर्लला मात्र कुठल्याही स्थितीत भन्साळींचा चित्रपट सोडायचा नाहीये. त्यामुळे ती सलमानची समजूत काढण्यात यशस्वी ठरते का हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 5:28 pm

Web Title: salman khan refused to star opposite priyanka chopra in sanjay leela bhansali next
Next Stories
1 ‘नेटफ्लिक्स’ला वेळीच रोखा अन्यथा.. स्टिव्हन स्पिलबर्गचा इशारा
2 या अभिनेत्रीला तैमुरसोबत जायचंय डेटवर
3 गेम ऑफ थ्रोन्समध्ये लोकाग्रहास्तव आर. आर. मार्टिनची एंट्री
Just Now!
X