22 September 2020

News Flash

सलमान खानमुळे मलायकाचा ‘दबंग ३’मधून पत्ता कट?

'दबंग ३'च्या आयटम साँगमधून मलायका अरोराचं नाव काढून टाकलं आहे.

सलमान खान, मलायका अरोरा

‘दबंग ३’च्या निमित्ताने चुलबूल पांडे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘दबंग २’नंतर सात वर्षांनी सलमान खानने या चित्रपटाची घोषणा केली आहे. यामध्ये सलमानसोबतच सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका आहे. ‘दबंग’च्या दोन्ही चित्रपटांतील आयटम साँग खूप गाजले. ‘दबंग ३’मध्येही आयटम साँग असेल पण त्यातून अभिनेत्री मलायका अरोराचा पत्ता कट झाला आहे. सलमान खानमुळे मलायकाची या चित्रपटातून गच्छंती झाली आहे असं कळतंय.

अरबाज खान आणि सलमानने मिळून ‘दबंग ३’च्या आयटम साँगमधून मलायका अरोराचं नाव काढून टाकलं आहे. तिच्या जागी आता करिना कपूर आयटम साँग करणार आहे. ‘दबंग २’ मधील ‘फेव्हिकोल से’ हा आयटम साँग खूप गाजला. त्यामुळे असाच काहीसा आयटम साँग ‘दबंग ३’मध्येही पाहायला मिळणार आहे. या गाण्यासाठी करिना कपूरची वर्णी लागली आहे.

Photos : वरुण-श्रद्धा झाले ‘स्ट्रीट डान्सर’

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटानंतर तिचं अर्जुन कपूरशी अफेअर असल्याची सर्वत्र चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यामुळे मलायकाला चित्रपटातून काढणं ही तशी आश्चर्यकारक बाब नाही. इतकंच नव्हे तर सलमान आणि अर्जुन कपूर यांच्याही नात्यात कटुता आली आहे. सलमानने अर्जुनसोबत भविष्यात काम करण्यासही नकार दिल्याचं कळतंय. मलायका आणि अर्जुन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 4:13 pm

Web Title: salman khan responsible for malaika arora exit in dabangg 3
Next Stories
1 अक्षय कुमारसोबत काम करणं अशक्य – शाहरुख खान
2 Photos : वरुण-श्रद्धा झाले ‘स्ट्रीट डान्सर’
3 गरज सरल्यावर बडे कलाकार मला विसरतात – कंगना रणौत
Just Now!
X