21 January 2019

News Flash

पिंपरीत ‘तो’ आला…त्यानं पाहिलं…त्यानं जिंकून घेतलं सारं !

९१ वर्षांच्या आजीबाईंही थांबल्या

पिंपरीत सलमान खान आल्यानंतर त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यात एका ९१ वर्षांच्या आजीबाईंचाही समावेश होता.

पिंपरी-चिंचवड : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पिंपरीत येणार याची खबर मिळताच त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सलमानला जवळून पाहण्याची इच्छा बाळगत लोक त्याची वाट पाहत राहिले. मात्र, बराच काळ झाला तरी तो आला नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी निराशा झाली. अखेर तो आला, ते ही तब्बल चार तास उशीराने त्यामुळे सहनशीलता दाखवली त्यांनाच त्याचे दर्शन घडले, ते ही केवळ दहा मिनिटांचेच. कारण तो आला… त्यानं पाहिलं… त्यानं जिंकलं अन् चाहत्यांना हात दाखवत क्षणात तो निघूनही गेला.

पिंपरीत एका प्रसिद्ध कंपनीच्या नव्या दागिन्यांच्या शोरुमचे उद्घाटन होणार होते. सलमान खान यासाठी प्रमुख पाहुणा म्हणून येणार होता. त्याला पाहण्यासाठी पिंपरीत प्रचंड गर्दी झाली होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सलमान खान पिंपरीत येणार असल्याने, त्याच्या चाहत्यांनी तीन वाजल्यापासूनच परिसरात गर्दी केली. तो आला, तो येतोय अशा अफवांमुळे गोंधळात भर पडत असल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. अखेर सलमान रात्री नऊ वाजता आला, त्याने चाहत्यांना हॅलो नमस्ते केले अन् तो उदघाटनाविनाच परतला. त्यामुळे अबालवृद्धांपासून सर्वच चाहत्यांची निराशा झाली. शेवटी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या दालनाचे उदघाटन उरकण्यात आले.

या गर्दीतल्या कलावती तलम या ९१ वर्षीय आजीबाई सलमान खानच्या चाहत्या आहेत. त्या चार वाजल्यापासून दालनाच्या जवळ त्याची वाट पाहात होत्या. मात्र, सलमान आला आणि खालच्या खालूनच निघूनही गेला त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला.

First Published on January 13, 2018 11:29 am

Web Title: salman khan returned with a glimpse of fan in pimpri