करोना व्हायरसाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. लॉकडाउनच्या काळात अभिनेता सलमान खान त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसमध्ये राहत आहे. तर त्याचे आईवडील मुंबईतल्या घरात राहत आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून वडिलांची भेट न झाल्याने व्याकूळ झालेल्या सलमानने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘मी तर घाबरलोय’ असं सलमान या व्हिडीओत म्हणत आहे.
सोहैल खानचा मुलगा निर्वाणसुद्धा सलमानसोबत फार्महाऊसमध्ये राहत आहे. निर्वाणसोबतच्या या व्हिडीओत सलमान म्हणतोय, “आम्ही सर्व तर घाबरलोय. गेल्या तीन आठवड्यांपासून मी माझ्या वडिलांना भेटलो नाही. निर्वाणसुद्धा त्याच्या वडिलांना भेटला नाही. जो डर गया वो मर गया असं म्हटलं जातं. पण जो डर गया वो बच गया अशी परिस्थिती सध्या आहे. आम्ही घाबरलोय हे बिनधास्त सांगतोय. कारण त्याशिवाय आता काही पर्याय नाही.”
आणखी वाचा : ‘जगा आणि जगू द्या’; इंटिमेट फोटोमुळे ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिता सेनच्या वहिनीचं उत्तर
सलमानने चाहत्यांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. ‘उगाचच धाडस दाखवत घराबाहेर पडू नका. ही ती वेळ नाही’, असं तो चाहत्यांना बजावतोय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 11:15 am