News Flash

“आता तो आपल्या घरात आलाय…माझ्या बहिणींना देखील करोना झाला”, सलमानचा खुलासा

नागरिकांना केलं लस घेण्याचं आवाहन

सध्या देशात करोनाचा कहर वाढत चालला आहे. करोनाच्या या दुसऱ्या लाटेने प्रत्येकाच्या घरात शिरकाव केलाय. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना देखील करोनाची लागण झाली. यातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या दोन्ही बहिणींना देखील करोनाचा सामना करावा लागल्याचं स्वत: सलमान खानने स्पष्ट केलंय.

सलमान खानचा ‘राधे’ सिनेमा येत्या ईदला म्हणजेच 13 मे ला ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतच इतर काही देशातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. एका वेबिनारमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियाशी बोलताना सलमानने या गोष्टीचा खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्याने बहीण अर्पिता आणि अलविरा दोघींना करोनाची लागण झाली होती अशी माहिती दिली. सोबतच देशातील सध्याच्या स्थिती बिकट असल्याचं तो म्हणाला.

सलमान खानला सध्याच्या करोनाच्या स्थितीबद्दल यावेळी विचारण्यात आलं. यावर तो म्हणाला, ” गेल्या वर्षी पेक्षा ही दुसरी लाट जास्त भयंकर आहे. या आधी आपण करोना इतरांच्या घरात कुणाला झाल्याचं आपण ऐकत होतो. मात्र आता तो आपल्या प्रत्येकाच्या घरात शिरला आहे. माझ्या दोन्ही बहिणींना देखील करोनाची लागण झाली होती. मात्र यातून त्या आता बऱ्या होत आहेत.” असं तो म्हणाला. दरम्यान सलमानची बहीण अर्पिताने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत. एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं. “मी सर्व नियमांच पालन केलं आणि देवाच्या कृपेने माझी प्रकृती उत्तम आहे” असं ती म्हणाली.”

याच वेळी सलमानने नागरिकांना लस घेण्याचं आवाहान केलं. “नुकतीच माझ्या आई वडिलांनी करोनाची लस घेतली आहे. तसचं मी देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला असून येत्या काही दिवसात दुसरा डोसही घेईन” हे सांगतानाच सलमानने देशातील प्रत्येक नागरिकाने करोना लस घेणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 10:13 am

Web Title: salman khan reveals his both sister arpita and alvira tested covid positive now recovered kpw 89
Next Stories
1 श्वेता तिवारीने शेअर केला CCTV फुटेजचा ‘तो’ व्हिडीओ; “हा शारीरिक अत्याचार नाही मग काय?”
2 Corona Crisis: मी काय केलं? ऐकाच! अमिताभ बच्चन यांनी टीकाकारांना दिला खणखणीत जवाब
3 Video: “कलाकार म्हणून ग्लॅमरस आणि बोल्ड होणं गरजेचं”, मोनालिसा बागलचा खुलासा
Just Now!
X