News Flash

भारत नव्हे, तर ‘या’ चित्रपटातील भूमिका सलमानसाठी आव्हानात्मक

सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे

सलमान खान

अली अब्बास जफर दिग्दर्शित, अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफच्या ‘भारत’ चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केली. या चित्रपटात दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटाची कथा भारत (सलमान खान) या व्यक्तीच्या भोवती फिरतांना दिसते. यामध्ये भारतच्या तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतचा काळ रंगविण्यात आला आहे. त्यामुळे सलमानला या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली. परंतु सलमानला त्याच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा सलमानने ‘भारत’ चित्रपटाचे नाव न घेता दुसऱ्या चित्रपटाचे घेतले आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना सलमानने ‘सुलतान’ चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक असल्याचे सांगितले. ‘सुलतानमधील भूमिका ही माझ्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. काही सीनसाठी मला वजन कमी करावे लागत होते तर काही सीनसाठी वाढवावे लागत होते. हे चक्र सुरुच होते. जेव्हा चित्रपटाचे शुटिंग नसत तेव्हा मला जिमला जावे लागे. त्यामुळे एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी हे आव्हानात्मक होते’ असे सलमान म्हणाला.

सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानंतर सलमान संजय लीला भन्साली यांच्या ‘ईन्शाल्ला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 1:49 pm

Web Title: salman khan reveals his most challenging film avb 95
Next Stories
1 मृण्मयीच्या मिस यू मिस्टरसोबत ‘या’ दिवशी होणार चाहत्यांची भेट
2 हॉकीनंतर फूटबॉल खेळण्यासाठी सागरिका सज्ज!
3 पुन्हा एकदा कार्तिक-साराची चर्चा, हिमाचलमधील फोटो व्हायरल
Just Now!
X