03 March 2021

News Flash

…म्हणून सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट कधीही सोडणार नाही

सलमानच्या पदरी निराशा येते.

अभिनेता सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानने झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘सारेगमप लिटल चॅम्प’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने सध्या राहत असणाऱ्या आपल्या घराविषयीची आत्मियता बोलून दाखवली. या कार्यक्रमातील ध्रुन नावाच्या छोट्या स्पर्धकाने सलमानला तुम्ही बऱ्याच दिवसांपासून गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येच का राहता? असा प्रश्न विचारला. एवढेच नाही तर त्याने सलमानला तुम्ही एखादा नवा बंगला सहज खरेदी करु शकता असेही म्हटले. यावर सलमान म्हणाला की, एखाद्या अलिशान बंगल्यापेक्षा मला या इमारतीतील घर अधिक प्रिय आहे. बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर माझे आई-वडिल राहतात. या इमारतीतच लहानाचा मोठा झालो आहे. माझ्यासाठी ही इमारत एका कुटुंबाप्रमाणे आहे. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा याच इमारतीच्या बगीच्यामध्ये मित्रांसोबत खेळायचो. या घरात माझ्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे मी हे घर कधीच सोडणार नाही.

सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटात सोहेल खान देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोमध्ये तो देखील सलमान खान सोबत सहभागी झाला होता. सलमानच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकतात प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला. ईदच्या दरम्यान प्रदर्शित होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धम्माल करेल, अशी सलमानसह दिग्दर्शक कबीर खानला आशा आहे. सलमानच्या या चित्रपटाची कथा भारत आणि चीन यांच्या युद्धजन्य परिस्थितीवर आधारित आहे. या चित्रपटात सलमान लक्ष्मण नावाची व्यक्तिरेखा साकरणार आहेत तर सोहेल खान भरत नावाची भूमिका साकारताना दिसेल. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही भाऊ भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी जातात. यात भरत अर्थात सोहेल खानची निवड होते. मात्र, सलमानच्या पदरी निराशा येते. युद्दाच्या दरम्यान भरत गायब झाल्यानंतर कथानक एक वेगळे वळण घेते. भावाच्या शोधात सलमान बाहेर पडतो. भावाच्या शोध घेण्यात सलमान यशस्वी होणार का? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्येच मिळेल. या चित्रपटात सलमान खानसोबत चिनी अभिनेत्री झू झू ही देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 2:24 pm

Web Title: salman khan reveals living bandra flat since childhood can afford bungalow
Next Stories
1 Video : …आणि रिअॅलिटी शोमधील ‘त्या’ टास्कमुळे शाहरुख भडकला
2 अभिनेत्री नूतन यांना गूगल डूडलची मानवंदना
3 ‘जस्टिस लीग’चे आव्हान
Just Now!
X