19 January 2020

News Flash

सलमान प्रियांकासह काम करणार पण ‘या’ अटीवर

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने याचा खुलासा केला आहे

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्राने ऐनवेळी भूमिका साकारण्यास नकरा दिल्यापासून चित्रपट चर्चेचा विषय झाला आहे. तसेच तिच्या या नकाराने सलमान दुखावला गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर सलमानने प्रियांकासह पुन्हा काम करण्यासाठी अट घातली आहे.

‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पाच दिवस आधी प्रियांकाने भूमिका साकारण्यास नकार दिला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने प्रियांकाने तिच्या लग्नामुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान सलमानला पुन्हा प्रियांकासह काम करण्याची संधी मिळाल्यास सलमान काम करणार का असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर सलमानने त्याची एक अट सांगितली आहे आणि त्या अटीनुसारच सलमान प्रियांकासह काम करणार असल्याचे त्याने सांगितले.

या अटींचा खुलासा करताना सलमनाने सांगितेल की भविष्यात त्याला प्रियांकासोबत नक्की काम करायला आवडेल पण त्याचा रोल चांगला असायला हवा. तसेच चित्रपटाती कथा देखील त्याला आवडायला हवी असे सलमानने सांगितले.

याआधी सलमान आणि प्रियांकाने ‘मुझसे शादी करोगी’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता सलमान आणि प्रियांकाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

First Published on May 22, 2019 12:40 pm

Web Title: salman khan reveles condition on which he will work with priyanka chopra again
Next Stories
1 मुलाच्या ‘त्या’ अटीनंतर सुंदरतेची परिभाषा बदलली – ताहिरा कश्यप
2 बिग बींनी सांगितलं ‘सूर्यवंशम’ वारंवार दाखविण्यामागचं खरं कारण
3 प्रभासच्या ‘साहो’मध्ये बॉलिवूडचा ‘भाईजान’?
Just Now!
X