24 October 2020

News Flash

दोस्त असावा तर असा! बॉबीचे करिअर सावरण्यासाठी सलमानची धडपड

बॉबीही म्हणतोय सलमान खानसाठी सबकुछ

बॉबी सलमान सोबत 'रेस ३' मध्येही काम करत आहे.

सलमान खान अर्थात सगळ्यांचा ‘भाईजान’! त्याच्या उदारपणाचे किस्से बॉलिवूडमध्ये काही नवे नाहीत. बॉलिवूडमध्ये अनेकांचं करिअर घडवण्यास सलमानचा वाटा मोठा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेक नवोदित कलाकारांना सलमाननं आपल्या मदतीचा हात देत मोठं केलं. मग ती कटरीना असो, डेझी शहा असो किंवा जॅकलिन असो.

इतकंच नाही तर सलमाननं अनेकांचं बॉलिवूडमधलं बुडत चाललेलं करिअरदेखील सावरलं आहे. अरमान कोहली, निल नितीन मुकेश, गोविंदा यांची बॉलिवूडमधली विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसावी यासाठी सलमाननं घेतलेली मेहनत अनेकांना माहिती आहे. तर आता ‘बडे दिलवला’ बजरंगी भाईजान बॉबी देओलसाठीही प्रचंड मेहनत घेत असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये आहे. बॉलिवूडमध्ये जम बसवण्यात बॉबीला फारसं यश आलं नाही, त्यामुळे त्याच्यासाठी सलमान सध्या धडपडत आहे. गेल्यावर्षांत प्रदर्शित झालेल्या ‘पोस्टर बॉईज’ सिनेमात बॉबी दिसला होता. या सिनेमात बॉबीनं साकरालेल्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. बॉबीच्या अभिनयाची छाप सलमानच्या मनावरही होतीच.

तर दुसरीकडे बॉबी सलमान सोबत ‘रेस ३’ मध्येही काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान बॉबीनं आपल्या अभिनयानं सलमानला चांगलच प्रभावित केलं आहे. म्हणूनच आता सलमाननं बॉबीला आणखी मोठी भूमिका देण्याची तयारी दर्शवली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सलमाननं बॉबीला ‘भारत’ या चित्रपटासाठी विचारलं आहे. या चित्रपटात बॉबीला मोठी भूमिका देण्यास सलमान उत्सुक आहे. विशेष म्हणजे तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे असं सांगत बॉबीनंही होकार दर्शवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 2:08 pm

Web Title: salman khan reviving bobby deols career in bollywood
Next Stories
1 प्रिती झिंटा छेडछाड प्रकरणी नेस वाडियाविरोधात आरोपपत्र दाखल
2 जयपूरच्या रस्त्यांवर पापड विकतोय बॉलिवूडचा हॅण्डसम हंक
3 Priya Varrier case: प्रिया वरियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा
Just Now!
X