09 August 2020

News Flash

सलमान जॅकलिनसोबत करतोय बाईक रायडिंग; व्हिडीओ होतोय व्हायरल

सलमानने जॅकलिननसोबत डोंगरांवर केली बाईक रायडिंग

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपल्या दबंग शैलीसाठी ओळखला जातो. रिल लाईफ असो की रिअल लाईफ सलमान कायमच आपल्या दबंग आवेगात असतो. सलमानचा असाच एक स्टाईलीश व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान जॅकलिनसोबत बाईकवर रायडिंग करताना दिसत आहे.

अवश्य पाहा – मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना

अवश्य पाहा – Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप

सलमानहोलिक्स या इन्स्टा अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत मनालीमध्ये बाईकवर रायडिंग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ लॉकडाउनच्या आधीचा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर आतापर्यंत ५५ हजारांपेक्षा अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. चाहत्यांना सलमानचा हा दबंग अंदाच प्रचंड आवडला आहे.

यापूर्वी सलमान मजुरांना केलेल्या मदतीमुळे चर्चेत होता. ‘बिइंग हंगरी’ या फूड ट्रकच्या मदतीने तो गरजूंना अन्नदान करत आहे. वांद्र्यामध्ये सलमानच्या एका रेस्टॉरंटमध्ये जवळपास १ हजार जेवणाची पाकिटं तयार केली जातात. ५०० सकाळच्या वेळात आणि ५०० संध्याकाळी. ही पाकिटं सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळांमध्ये मुंबईतील ठिकठिकाणच्या झोपडपट्टी, स्टेशन परिसर, मंदिर आणि मस्जीद या ठिकाणी असलेल्या गरीबांमध्ये वाटली जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 11:24 am

Web Title: salman khan riding with jacqueline fernandez in manali mppg 94
Next Stories
1 बुर्ज खलिफामध्ये आहे सुपरस्टार मोहनलालचं घर; लाइफस्टाइलच्या बाबतीत राजा-महाराजांनाही देतात टक्कर
2 “तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार”; प्रवीण तरडेंनी शेतकऱ्याला दिला शब्द
3 तारांगण घरात : अंतर्मुख होऊन जगाकडे बघताना..
Just Now!
X