30 May 2020

News Flash

Sultan Trailer: ‘ऐसा दाव मारो की जिंदगी चीत हो जाए’, सलमानच्या ‘सुलतान’चा ट्रेलर प्रदर्शित

हरियाणातल्या कुस्तीपटूचा ऑलिम्पिक ते बॉक्सिंग पर्यंतचा प्रवास

एका कुस्तीपटूच्या आयुष्यात आलेले चढ-उतार चित्रपटात पाहायला मिळणार

‘ऐसा दाव मारो की जिंदगी चीत हो जाए’..म्हणत बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आपल्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटातून कुस्तीपटूच्या भूमिकेत चाहत्यांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, पैलवानाचे रांगडे व्यक्तीमत्व, हरियाणवी भाषा, मिशांना ताव देणारा सलमान आणि लक्षवेधी संवादांनी भरलेला ट्रेलर रोमांच वाढवणारा आहे. सलमान, सलमान आणि फक्त सलमान हे गणित सलमानच्या याही चित्रपटात कायम असल्याचे ट्रेलरवरून दिसते. एका कुस्तीपटूच्या आयुष्यात आलेले चढ-उतार चित्रपटात पाहायला मिळणार असून, चित्रपटाची नायिका देखील कुस्तीपटू दाखविण्यात आली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने चित्रपटात महिला कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. हरियाणातल्या कुस्तीपटूचा ऑलिम्पिक ते बॉक्सिंग पर्यंतचा प्रवास ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, धारधार संवाद चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे आहेत.
चित्रपटात सलमान आणि अनुष्कासोबत रणदीप हुडा देखील महत्त्वाचा भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखन दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केले असून, यंदा ईदच्या मुहूर्तावर ‘सुलतान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2016 9:29 am

Web Title: salman khan rules supreme in sultans trailer
Next Stories
1 VIDEO: शिव आणि गौरीची ‘सैराट डेट’
2 झी टॉकीजवर रविवारपासून अ‍ॅनिमेशन चित्रपटांची मेजवानी
3 ‘कानांची घडी तोंडावर बोट’!
Just Now!
X