News Flash

आरारारा खतरनाक!!! मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकमधील सलमानचा लूक व्हायरल

सलमानचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील नातं सर्वांनाच माहित आहे. या दोघांमधली मैत्री सगळ्यांना ठावूक आहे. शेराने नुकताच सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ यातील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शेराने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शेरा सोबत सलमान दिसत आहे. सलमान त्याच्या विचारत असल्याचे दिसत आहे. सलमानने काळ्यां रंगाची बंडी आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली असून त्याने लाल रंगाची पगडी घातली आहे. तर त्याच्या हातात कॉफी मग आहे. हा फोटो शेअर करत शेराने “थ्रोबैक फ्राइडे  #SalmanKhan #Sheraa #Beingsheraa #Antim” असे हॅशटॅग कॅप्शनला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Sheraa (@beingshera)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘अंतिम’ या चित्रपटात सलमानचा मेहूणा आयुष शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. या महिन्यात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सलमान ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. सलमान खानने ‘राधे: तेरा मोस्ट वांटेड भाई’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटानी दिसणार आहेत. हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2021 7:23 pm

Web Title: salman khan s bodyguard shera treats us with an unseen picture of bhai from his upcoming film antim the final truth dcp 98
Next Stories
1 हृतिकची Ex- wife सुझान करतेय या अभिनेत्याला डेट?
2 ओपरा विन्फ्रेच्या ‘या’ प्रश्नावर प्रियांका विचारात पडली!, मेगन मर्केलनंतर प्रियांका करणार खुलासा
3 ‘झिम्मा’च्या ‘त्या’ बोल्डसीनमुळे सायली संजीव चर्चेत
Just Now!
X