अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या जागी एखादा अभिनेता असता तर कदाचित त्याला इतकी वाईट वागणूक दिली नसली अशी खंत अभिनेत्री कोंकना सेन शर्माने व्यक्त केली. कोणत्याही आरोपीला थोडी तरी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, असं मत तिने मांडलं.

‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत कोंकना याबद्दल म्हणाली, “आरोपी कोणताही असो त्याला किमान सन्मानाची वागणूक दिलीच पाहिजे. रियाच्या बाबतीत हे अजिबात घडताना दिसत नाही. तिच्याविरोधात अजून पुरावे मिळाले नाहीत. फक्त आरोप-प्रत्यारोप होत आहेत आणि हे आरोप-प्रत्यारोप संसदेच्या सदस्यांवरही होत असतात. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत ज्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे, तरीही आपण त्यांना सन्मानाची वागणूक देतो. सलमान खान, संजय दत्त यांच्यावर काही गंभीर आरोप होते, तरीसुद्धा आपण त्यांच्याशी आदराने वागतो. मग रियाबद्दल हे का घडत नाही?”

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोप रिया चक्रवर्ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अमली पदार्थांची खरेदी आणि अन्य आरोपांखाली एनसीबीने रियाला अटक केली.