20 November 2019

News Flash

सलमान म्हणतो, कतरिनासाठी मी ‘भाईजान’ नाही तर…

सलमानचं उत्तर ऐकून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

सलमान खान, कतरिना कैफ

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चर्चेत असते तितकीच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चाहत्यांना आवडते. या दोघांची मैत्रीसुद्धा सर्वश्रुत आहे. ‘भारत’ चित्रपटासाठी प्रियांका चोप्राने ऐनवेळी नकार दिल्यामुळे सलमानने कतरिनाची मदत घेतली. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखला जातो. पण कतरिनासाठी मी भाईजान नाही, असं सलमानने एका कार्यक्रमात सांगितलं आहे.

प्रियांकाने नकार दिल्यापासून सलमानने अनेकदा अप्रत्यक्षरित्या तिला टोला लगावला आहे. ‘भारत’मधील एका गाण्याच्या लाँच कार्यक्रमातदेखील सलमानने प्रियांकाचे आभार मानले. प्रियांकाने नकार दिल्यामुळे कतरिनाला ही भूमिका मिळाली असं तो म्हणाला. यावेळी प्रश्नोत्तरांदरम्यान पत्रकारांनी सलमानला भाईजान म्हणून हाक मारली. याकडे कतरिनाने फारसं लक्ष दिलं नाही आणि सलमान लगेच म्हणाला, ‘पाजी, इनके लिए भाईजान नहीं हूँ मैं’ (तिच्यासाठी मी भाईजान नाहीये). हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दुसऱ्याच क्षणी पुन्हा मस्करी करत सलमान म्हणाला, ‘क्या भरोसा, भाईजान भी बुला सकती है’ (काही विश्वास नाही, भाईजान म्हणून पण हाक मारु शकते). हे बोलताना तो स्वत:च मोठ्याने हसला. आता कतरिनासाठी भाईजान नाही म्हटल्यावर तिला काय म्हणून हाक मारायला आवडेल असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावर ‘मेरी जान’ असं उत्तर सलमानने दिलं.

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘भारत’ येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on May 18, 2019 2:16 pm

Web Title: salman khan says he is not bhaijaan for katrina kaif
Just Now!
X