News Flash

सलमानचे संपूर्ण कुटुंब आहे या क्रिकेटपटूचे वेडे

किती टक्के भारतीय कपिल देव, सौरव गांगुली, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनीपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट कर्णधार मानतात हा प्रश्न विचारण्यात आला

सलमान खान, सलीम खान

अरबाज खानचे नाव आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये आल्याने सलमानसह त्याचे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असेही म्हटले जात होते की, दबंग ३ सिनेमाच्या प्रोजेक्टमधून सलमान अरबाजला वगळण्याचा विचार करत आहे. सट्टेबाजीकडे त्याचा कल पाहता याआधीच सलमानने दिग्दर्शनाची जबाबदारी त्याच्याकडून काढून घेतली होती. पण आता सलमानला प्रोडक्शनच्या टीममधूनही अरबाजला वेगळे करायचे आहे. सध्या सलमान दस का दम या रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

MS Dhoni wife Sakshi , Salman khan

शोदरम्यान सलमानने अनेक गोष्टींचे खुलासे केले. सलमान म्हणाला की, त्याला आणि वडिलांना सलीम खान यांना क्रिकेट प्रचंड आवडते. सलमानने आतापर्यंत त्याचे क्रिकेट प्रेम वेळोवेळी दाखवले आहे.

salman-khan सलमान खान

चित्रीकरणादरम्यान सलमानने सांगितले की, त्याला महेंद्र सिंग धोनी फार आवडतो. याआधीही सलमानने माहीसाठी त्याच्या मनात असलेले प्रेम व्यक्त केले आहे. दबंग खानने सुलतान सिनेमाच्या प्रदर्शनावेळी धोनी आणि साक्षीला त्याच्या घरी बोलावलेले होते. याशिवाय अनेक कार्यक्रमांना सलमानने अनेकदा माहीला खास आमंत्रण दिले आहे.

शोदरम्यान स्पर्धकाला किती टक्के भारतीय कपिल देव, सौरव गांगुली, विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यापैकी कोणाला सर्वोत्कृष्ट कर्णधार मानतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नानंतर सलमान म्हणाला की, त्याच्या घरी अनेकांना धोनी फार आवडतो. त्याच्या वडिलांच्यामते, धोनी सर्वात कूल कर्णधार आहे. तो मैदानावर नेहमीच संयमाने वागतो. कोणत्याही खेळात ते फार महत्त्वाचे असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 6:24 pm

Web Title: salman khan says his favourite cricketer mahendra singh dhoni
Next Stories
1 Top 5: बॉलिवूडचे हे कोट्याधीश स्टार आजही वापरतात स्वस्त गाडी
2 लग्नाचं प्रपोजल देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला रवीना म्हणाली…
3 Kaala Movie: १० वर्षांपासून या जपानी जोडप्याची रजनीकांतसाठी भारताला ‘स्पेशल विझिट’
Just Now!
X