18 October 2019

News Flash

…म्हणून सलमानला नकोय राष्ट्रीय पुरस्कार

आजपर्यंत सलमानला एकदाही राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही.

सलमान खान

जवळपास तीन दशकांपासून बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान इंडस्ट्रीवर राज्य करतोय. सलमानच्या कित्येक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कमाईचे विक्रम रचले. अनेकदा वादात अडकलेल्या ‘दबंग खान’ला प्रेक्षकांना कसे चित्रपट आवडतात हे अचूकपणे कळलेलं आहे. पण आजपर्यंत सलमानला एकदाही राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. हा पुरस्कार मिळावा अशी इच्छा आहे का असा प्रश्न विचारल्यावर सलमानने राष्ट्रीय पुरस्कार नको असल्याचं सांगितलं.

‘मला राष्ट्रीय किंवा इतर कोणताही पुरस्कार नकोय. मला फक्त बक्षीस हवंय. लोक जेव्हा माझा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात, तोच माझ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद असतो. संपूर्ण देशभरातील लोकांनी माझा चित्रपट पाहणे यापेक्षा दुसरा कोणताच पुरस्कार मोठा नाही आणि हेच बक्षीस मला हवंय,’ असं सलमान म्हणाला. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित कार्यक्रमात सलमानने ही भावना व्यक्त केली.

वाचा : कर्मवीरपासून गुंतवणूक सल्लागापर्यंत ‘कोण होणार करोडपती’चं वेगळेपण 

सलमानचा आगामी ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कतरिना कैफचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यासोबतच जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, नोरा फतेही हे कलाकारदेखील चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात सलमानने तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत अनेक रुपं साकारली आहेत. त्यामुळे सलमान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on May 21, 2019 2:44 pm

Web Title: salman khan says i do not want a national award