News Flash

Bigg Boss 12: सलमान म्हणतो, कतरिनाला माझ्यासोबत सूत्रसंचालन करायचं होतं पण..

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ठरणारा 'बिग बॉस १२' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

katrina kaif , salman khan
कतरिना कैफ , सलमान खान

लवकरच ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं १२ वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये ‘विचित्र जोडी’ ही संकल्पना पाहायला मिळणार असून नुकतंच या शोचं गोव्यामध्ये लॉन्चिंग करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी सलमान नेहमीप्रमाणे त्याच्या हटके अंदाजामध्ये झळकल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी त्याने अभिनेत्री कतरिना कैफबद्दल एक खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ठरणारा ‘बिग बॉस १२’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये दरवेळीप्रमाणे सलमान खान सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडणार असून त्याच्याबरोबर अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही अफवा खुद्द कतरिनानेच पसरविल्याचं सलमानने लॉन्चिंगवेळी म्हटलं आहे.

‘कतरिनाला ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वामध्ये झळकायची इच्छा होती. विशेष म्हणजे तिला माझ्याबरोबर सूत्रसंचालन करायचं होती. पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यामुळे या शोमध्ये कतरिना माझ्याबरोबर झळकणार असल्याची अफवा तिनेच पसरविली असेल, असं मला वाटतं. मात्र असं काही होणार नसून केवळ मीच सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडणार आहे, असं सलमान म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाली, ‘कतरिनाने मला या शोविषयी विचारल्यानंतर ‘या शोमध्ये तू काय करणार ?’ असा प्रतिप्रश्न मी तिला विचारला होता. यावर ‘मी स्क्रिप्टनुसार काम करेन, तसंच तुला फॉलोदेखील करेन. मात्र मानधन तुझ्या इतकंच घेईन’,असं कतरिना म्हणाली होती.  दरम्यान, कतरिना या शोमध्ये सूत्रसंचालन जरी करणार नसली तरीदेखील ती या शोमध्ये हजेरी लावणार आहे. यावेळी ती तिच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 2:41 pm

Web Title: salman khan says on co hosting bigg boss 12 with katrina kaif its rumours spread by her
Next Stories
1 केरळनंतर नागालँडच्या मदतीला धावला ऑनस्क्रिन धोनी
2 परेश रावल यांचा मुलगा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज
3 पार्श्वगायक कुमार सानू यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X