बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या कतरिना कैफची बहिण इसाबेल बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी इसाबेलचा आणि अभिनेता सूरज पांचोली यांच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसत आहे. आता बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानने चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये इसाबेल आणि सूरज दोघे दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
View this post on Instagram
‘टाईम टू डान्स’ हा चित्रपट डान्सशी संबंधित आहे. या चित्रपटाची निर्माती कोरिओग्राफर रेमो डिसूझाची पत्नी लिझेल डिसूझा आहे. तर कोरिओग्राफर स्टॅनली डिकोस्टा हा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. चित्रपटाच्या ट्रेलरला ३८ लाख पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.
या व्यतिरिक्त ‘सुस्वागतम खुशामदीद’ या चित्रपटातही अभिनेता पुलकीत सम्राटसोबत इसाबेल काम करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 7:28 pm