01 March 2021

News Flash

सलमान घालवतोय भाचीसोबत वेळ, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ

बॉलिवूडचा भाईजान सलामान खान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तो सोशल मीडियाद्वारे त्याच्या आगामी प्रोजेक्ट विषयी माहिती देत असतो तसचे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. त्याने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ हे कायम चर्चेत असतात. नुकताच सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सलमानची बहीण अर्पिता खान शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. सलमानने तोच व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. या व्हिडीओत सलमान भाची आयत सोबत दिसत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तू जो मिला’ हे गाण सुरू आहे. या व्हिडीओ २० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दरम्यान, सलमानने त्याचा आगामी चित्रपट ‘राधे’चं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. सलमान सध्या बिग बॉसच्या १४ व्या पर्वाचं सूत्रसंचालन करत असून सोबतच ‘अंतिम’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मंहेश मांजरेकर करत आहेत. हा चित्रपट मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा रिमेक असून ऑगस्ट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 11:29 am

Web Title: salman khan shared a video of him and his niece ayat went viral dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्ये होणार हुरडा पार्टी !
2 आता होणार ‘हंगामा’; शिल्पा शेट्टीचं रुपेरी पडद्यावर कमबॅक
3 अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यामुळे बिग बी ट्रोल
Just Now!
X