25 February 2021

News Flash

‘पीआरडीपी मुमेन्ट’ पाठवण्याचे सलमानचे आवाहन!

सलमानने आपल्या कुटुंबाचा 'पीआरडीपी मुमेन्ट' ट्विट केला आहे.

सलमानचे त्याच्या कुटुंबावर असलेले प्रेम हे सर्वश्रुत आहे आणि आता तर त्याचा ‘प्रेम रतन..’ हा कौटुंबिक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. ‘प्रेम रतन धन पायो’च्या प्रसिद्धीकरिता सलमानने आपल्या कुटुंबाचा ‘पीआरडीपी मुमेन्ट’ फोटो ट्विट केला आहे. ज्यांचे कुटुंब असते ते नशिबवान असतात हा चित्रपटातील त्याचा प्रसिद्ध डायलॉग ही त्याने टि्वट केला आहे. या छायाचित्रात सलमानने लाल रंगाचे टीशर्ट परिधान केलेले दिसते. यात त्याचे वडिल सलीम खान, आई सुशिला चारक आणि हेलन, त्याची भावंडे आणि त्यांची मुले असा पूर्ण परिवार फोटोत दिसतोयं.

या फोटोनंतर त्याने आपल्या चाहत्यांनाही कुटुंबासमवेतचे ‘पीआरडीपी मुमेन्ट’ फोटो प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे. त्याने म्हटले की, आता तुमची वेळ आहे. तुमचा कौटुंबिक फोटो ट्विट करा आणि त्यानंतर पीआरडीपी स्पर्धेसाठी त्याचे ट्विटर पेज पाहा. या स्पर्धेला त्याच्या चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या  ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 1:52 pm

Web Title: salman khan shares his prdp family moment asks fans to join in
टॅग : Salman Khan
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांचा लोकल प्रवास
2 पाहाः ‘बाजीराव मस्तानी’मधील दीपिका-प्रियांकाचे ‘पिंगा’ गाणे
3 ‘प्रेम रतन धन पायो’ची शंभर कोटीच्या क्लबमध्ये वर्णी
Just Now!
X