नेहमीच आपल्या दमदार लूकने चाहत्यांना घायाळ करणाऱया सलमान खानच्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटातील आणखी एक लूक चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. सलमाननेही हा फोटो शेअर केला आहे.

छायाचित्रात सलमान ‘क्लिन शेव लूक’मध्ये दिसून येत असून, त्याच्या चेहऱयावर माती आणि रक्त लागलेले आहे. यातून हे छायाचित्र अॅक्शन सीन चित्रीत करतानाचे असल्याचे स्पष्ट होते.

‘सुलतान’मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा सलमानसोबत रोमॅन्स करताना दिसणार असुन या चित्रपटाच्या चित्रिकरणाला तिने याआधीच सुरूवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानने आपल्या बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ‘ईद’च्या मुहूर्ताची निवड केली असून, यंदाच्या ‘ईद’ला एकाच दिवशी सलमानचा ‘सुलतान’ आणि शाहरुखचा ‘रईस’ चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.