19 October 2020

News Flash

सलमान खानने गायलं देशभक्तीपर गीत; व्हिडीओ होतोय व्हायरल

सलमान खानने गाणं गाऊन दिल्या स्वातंत्र्यदिनाच्य़ा शुभेच्छा

३ ऑक्टोबर पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान अभिनयासोबत आता संगीत क्षेत्रातही सक्रीय झालाय. अलिकडेच त्याने गायलेल्या ‘प्यार करोना’ आणि ‘तेरे बिना’ या गाण्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. या दोन यशस्वी गाण्यानंतर आता सलमानचं तिसरं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. यावेळी भाईजानने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक देशभक्तीपर गीत गायलं आहे. त्याने या गाण्याच्या माध्यमातून देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य पाहा – पहिल्या स्वातंत्र्यदिनाचा व्हिडीओ पोस्ट करत प्रियांकाने दिल्या शुभेच्छा

अवश्य पाहा – “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”; वाचा स्वातंत्र्यदिनावर गाजलेल्या शायऱ्या

‘सारे जहां से अच्छा से हिंदुस्तां हमारा’ हे प्रसिद्ध गाणं सलमानने आपल्या शैलीत गायलं आहे. या गाण्याचं दिग्दर्शन अतुल अग्निहोत्री याने केलं आहे. त्याने या गाण्याची एक झलक सलमान चाहत्यांसाठी ट्विट केली आहे. या गाण्याच्या माध्यमातून सलमानने देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासीयांना अधिकाधिक आत्मनिर्भर होण्याचा यावेळी त्यांनी संदेश दिला. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहुर्तावर देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा, जय हिंद!” असं ट्विट करूनही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:28 pm

Web Title: salman khan sing a song sare jahan se achha 15 august independence day of india mppg 94
Next Stories
1 “सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है”; वाचा स्वातंत्र्यदिनावर गाजलेले शेर
2 इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
3 इतिहास तेव्हाच घडतो जेव्हा महिला… ; प्रियांकाने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
Just Now!
X