25 January 2021

News Flash

सलमानच्या बहिणीने दुबईतल्या हॉटेलमध्ये फोडल्या प्लेट्स; व्हिडीओ व्हायरल

प्लेट्स फोडल्यानंतर केला डान्स

दुबईतल्या एका हॉटेलमध्ये सलमानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने प्लेट्स फोडल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामागे एक कारण आहे. अर्पिताने त्या प्लेट्स रागाच्या भरात नाही तर ग्रीक प्रथेचा भाग म्हणून फोडल्या. संबंधित हॉटेलमध्ये ती प्रथा पाळण्यात येते. यामुळे वाईट गोष्टींपासून दूर राहण्यास मदत होते असा समज आहे.

या व्हिडीओमध्ये अर्पिता आनंदाने हे प्लेट्स खाली फेकताना दिसतेय. त्यानंतर काही महिलांसोबत मिळून ती काही प्लेट्स फोडताना दिसतेय. प्लेट्स फोडल्यानंतर अर्पिताने त्यांच्यासोबत मिळून डान्ससुद्धा केला.

आणखी वाचा : राहुल वैद्यने सोडलं ‘बिग बॉस’चं घर; मागितली सलमानची माफी

अर्पिताने आयुष शर्माशी लग्न केलं असून नुकतंच दोघांनी लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. आयुषने ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद मिळाला. आता सलमान ‘मुळशी पॅटर्न’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये आयुषला मुख्य भूमिकेत घेत असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2020 10:46 am

Web Title: salman khan sister arpita seen smashing plates in dubai restaurant video goes viral ssv 92
Next Stories
1 Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडलं ‘बिग बॉस’चं घर; मागितली सलमानची माफी
2 दिलजीतच्या ‘त्या’ ट्विटवर प्रियांका चोप्रा झाली व्यक्त, ट्विट करत म्हणाली…
3 ‘शेतकरी आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका’; दिलजीतचं जनतेला आवाहन
Just Now!
X