सलमान खानची बहीण अर्पिता खानचे सासरे अनिल शर्मा हिमाचल येथील मंडी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. ते वीरभद्र सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर सलमानने अनिल शर्मा यांच्यासाठी रोड शो करावा अशी त्यांची इच्छा होती. पण रोड शोवेळी सलमान मात्र ऐनवेळी गैरहजर राहिला होता. शर्मा यांचा मुलगा आयुष शर्मा आणि सलमानची बहीण अर्पिता खान यांनी १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये लग्न केले होते. त्या दोघांच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण खान कुटुंबीय हिमाचल प्रदेशात गेले होते.

वडिलांच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी सोडले काँग्रेस</strong>
– काँग्रेस सोडल्यानंतर अनिल शर्मा यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ‘हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन मी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यापुढे नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल भविष्याचे जे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.’
– अनिल शर्मा यांच्या मते, अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये त्यांना गुदमरल्यासारखे होत होते. तसेच त्यांच्या कुटुंबालाही दुर्लक्षित करण्यात येत होते. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना हे पाऊल उचलावे लागले होते.
राहुल गांधी यांच्या मंडी रॅली दरम्यान, अनिल शर्मा यांच्या वडिलांना (पंडित सुखराम) विरोध करण्यात आला होता. यामुळेच अनिल यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला नाही. निवडणुकांदरम्यानही त्यांना आणि त्यांच्या वडिलांना कोणतेही स्थान दिले नव्हते. म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र अनिल शर्मा
– हिमाचल प्रदेश येथील ग्रामीण विकास, पंचायती राज व पशुपालन मंत्री अनिल शर्मा हे पूर्व केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र आहेत.
– हिमाचलमध्ये निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अनिल शर्मा यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या जाण्याने काँग्रेसला फार मोठा धक्का बसला होता.