11 December 2019

News Flash

सलमान खानविरोधात तक्रार दाखल

डीएन नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल

सलमान खान

अभिनेता सलमान खानने भररस्त्यात एका व्यक्तीचा फोन हिसकावून घेतल्याप्रकरणी त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशोक श्यामलाल पांडे या व्यक्तीने सलमानविरोधात मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

बुधवारी सायंकाळी सलमान आणि त्याचे काही अंगरक्षक जुहू येथे सायकलिंग करत होते. सलमानला असं रस्त्यावर पाहून त्याचे काही चाहते त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र व्हिडिओ शूट करणाऱ्या एका चाहत्यावर सलमान चांगलाच संतापला. त्याने रागाच्या भरात या चाहत्याचा फोन हिसकावून घेतला. काही वेळानंतर सलमानच्या अंगरक्षकांनी या चाहत्याचा फोन परत दिला. मात्र या प्रकरणी या चाहत्याने सलमानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फोन हिसकावून गैरवर्तन केल्याचा आरोप सलमानवर ठेवण्यात आला आहे.

“सलमान एक सेलिब्रिटी आहे आणि या नात्याने कुणाच्या गाडीत हात टाकून तो मोबाईल हिसकावू शकत नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करावी,’ असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. अशोक श्याम लाल पांडे असे सलमानविरोधात तक्रार दाखल करणा-या पत्रकाराचे नाव आहे. विशेष म्हणजे, या तक्रारीनंतर सलमानच्या सुरक्षारक्षकानेही एक समांतर तक्रार दाखल करत, संबंधित पत्रकारावर सलमानचा पाठलाग करून विना परवानगी व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला आहे.

 

First Published on April 25, 2019 6:33 pm

Web Title: salman khan snatched phone from his fan to save him for accident
Just Now!
X