06 July 2020

News Flash

पाहाः सलमान-सोनमच्या ‘प्रेम रतन धन पायो’चा ट्रेलर

सलमान-सोनमच्या प्रेम रतन धन पायो चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं प्रदर्शित झाला आहे.

‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित नुकतेच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर राजश्री बॅनरची खासियत असलेल्या टिपिकल रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

सलमान-सोनमच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताचं प्रदर्शित झाला आहे. राजश्री प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
भव्यदिव्य महालामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, यात सलमान खान दुहेरी भूमिकेत पाहावयास मिळणार आहे. राजकुमारच्या भूमिकेत ‘प्रेम’ तर दुस-या फाईटरच्या भूमिकेत ‘विजय’ अशा दोन भूमिका सलमान चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटात सलमान आणि सोनम कपूरसह अनुपम खेर, नील नितिन मुकेश, स्वरा भास्कर आणि अरमान कोहलीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2015 2:17 pm

Web Title: salman khan sonam kapoors prem ratan dhan payos trailer
Next Stories
1 झंझावती ‘बायकर्स अड्डा’
2 ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून कपिल शर्माला हकलले!
3 दिग्दर्शक रोहन सिप्पीची डिजिटल माध्यमांशी दोस्ती!
Just Now!
X