News Flash

सलमानचं मराठी ‘लय भारी’- रितेश

रितेश देशमुखच्या आगामी 'लय भारी' चित्रपटातून बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

| September 2, 2013 06:45 am

रितेश देशमुखच्या आगामी ‘लय भारी’ चित्रपटातून बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. रितेश सध्या अमराठी असलेल्या सलमानच्या मराठी भाषेची स्तुती करत आहे. ‘लय भारी’ हा रितेश देशमुखची निर्मिती असलेला दुसरा चित्रपट असून तो स्वतःही या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
रितेश देशमुख म्हणाला की, मी अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. पण, सलमानसोबत मी काम केले नव्हते. त्याने मराठी चित्रपटात काम करण्यास होकार दिल्यामुळे मी त्याचा आभारी आहे. ‘लय भारी’मध्ये त्याच्यासोबत मी एक लहानसा सिनही केला आहे. सलमानची आई मराठी असल्यामुळे त्यालाही मराठीत बोलण्याची इच्छा होती. तो खूप चांगल मराठी बोलतो. तसेच, आम्ही सेटवरही मराठीतच बोललो. त्याच्यासोबत काम करताना खूप धमाल आली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 6:45 am

Web Title: salman khan speaks great marathi riteish deshmukh
टॅग : Bollywood,Salman Khan
Next Stories
1 पहाः नरगिस फक्रीचे ‘ढटिंग नाच’ आयटम साँग
2 सलमानसोबत करण जोहर काम करत नाही कारण..
3 नाना ठणठणीत!
Just Now!
X