News Flash

ईद निमित्तानं सलमानचं चाहत्यांना आवाहन; “घराबाहेर जमा होऊ नका, मी भेटायला येऊ शकणार नाही…”

यंदाच्या ईदला सलमानचा काय आहे वेगळा प्लॅन ?

प्रत्येक वर्षीच्या ईदच्या दिवशी सलमान खान त्याचा चित्रपट प्रदर्शित करून त्याच्या चाहत्यांना भेट देतच असतो. यंदाच्या ईदच्या दिवशी त्याचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या दिवशी सलमानचे चाहते त्याच्या घराबाहेर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. सलमान सुद्धा त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी त्याच्या घरातील बाल्कनीमध्ये येत असतो. पण गेल्या एक वर्षापासून करोना आणि लॉकडाउनच्या परिस्थितीमूळे ईदच्या दिवशी सलमान त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीमध्ये आलाच नाही आणि त्याचे चाहते ही सलमानच्या घरासमोर येऊ शकले नाहीत. या वर्षीसुद्धा सलमान खानने त्याच्या चाहत्यांना आवाहन केलंय. तो त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येऊ शकणार नाही, त्यामूळे त्याच्या घराबाहेर एकत्र येऊन गर्दी करू नका, असं आवाहन सलमान खानने केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मुलाखतीत सांगितला ईदच्या दिवशीचा प्लॅन
सलमान खानने मुंबईत एका व्हर्चुअल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सलमान म्हणाला, “गेल्या वर्षीच्या ईदपेक्षा यंदाच्या ईदचा प्लॅन खूप वेगळा केला आहे. या वर्षीच्या ईदच्या दिवशी प्रत्येक जण आपाआपल्या घरातच असणार आहे. मी तळमजल्यावर राहतो, माझे आई-वडील वरच्या मजल्यावर राहतात. घरी माझे भाऊ-बहीण आहेत. या दिवशी कोणीच घरासमोर एकत्र येऊन गर्दी करणार नाही, अशी मी आशा करतो. कोणत्याच कलाकाराच्या घराबाहेर जमा होऊन गर्दी करू नका.”

करोना रूग्ण संख्येत झालेली घट पाहता सलमान खानने त्याचा चित्रपट ‘राधे’ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. परंतू काही दिवसांतच करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही निवडक थिएटर्स सोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं ठरवण्यात आलं. आधीच ठरल्याप्रमाणे सलमान खानने ईदच्या दिवशीच त्याचा चित्रपट प्रदर्शित केलाय खरा, परंतू घराबाहेर येऊन चाहत्यांना भेटण्यासाठी मात्र त्याने नकार दिलाय.

‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खानपेक्षा 27-28 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री दिशा पटानीही आहे. तर रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ हेही या चित्रपटात दिसणार आहेत. यात सलमान खान एका अंडरकव्हर पोलिसाच्या भूमिकेत आहे तर खलनायक असलेला रणदीप हुड्डा गोव्याच्या एका हिंसक आणि सणकी स्वभावाच्या ड्रग माफियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 2:58 pm

Web Title: salman khan special appeal to fans shares his eid plans prp 93
Next Stories
1 Video: पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने स्वत: रिक्षावर चिटकवले होते पोस्टर
2 Haryanvi Song: विश्वजीत चौधरींचा ‘कर्फ्यू’ होतोय व्हायरल; व्हिडीओमध्ये दिसला त्यांचा स्टायलिश अंदाज
3 वाढत्या वयामुळे होणाऱ्या बदलांबद्दल प्रियांका म्हणते….
Just Now!
X