News Flash

सलमान खान मुंबईत परतला का? जाणून घ्या सत्य

सलमानला कुटुंबीयांची सतत आठवण येत असल्यामुळे तो मुंबईला परतला असे म्हटले जात होते.

सलीम खान, सलमान खान

संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लूलिया वंतूर आणि वलूशा डिसूजादेखील फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान मुंबईत परतला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे म्हटले जात आहे.

सलमानला कुटुंबीयांची सतत आठवण येत असल्यामुळे तो मुंबईला परतला असे म्हटले जात होते. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान अजूनही त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर आहे. तर सलमानचे आई- वडिल वांद्रे येथील घरी आहेत. कुटुंबीयांच्या जवळ असलेल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘या महिन्याच्या शेवटपर्यंत सलमानच्या राधे या प्रभूदेवा दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण होते. पण चित्रीकरण रद्द झाल्यामुळे सलमानने फार्महाऊसवर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.’

काही दिवसांपूर्वी सलमानचा फार्महाऊसवरील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तो वलूशा डिसूजासोबत गप्पा मारताना दिसत होता. त्यावेळी त्याने ‘मी गेल्या कित्येक दिवसांपासून कुटुंबीयांवेळ देण्याचा प्रयत्न करत होतो. लॉकडाउनमुळे अर्पिता, तिची मुले, आई माझे सर्व कुटुंबीय इथे माझ्यासोबत होते. पण आता ते घरी परतले आहेत’ असे म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे ‘तेरे बिना’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यामध्ये सलमानसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस दिसत आहे. सुधीर एहमद याने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. स्वत: सलमानने हे गाणे गायले आहे. तसेच गाण्याच्या व्हिडीओचे दिग्दर्शनही स्वत: सलमाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 8:07 pm

Web Title: salman khan still at panvel farmhouse not back to mumbai home avb 95
Next Stories
1 वयाच्या ८६व्या वर्षी आशा भोसले यांचे यूट्युबवर पदार्पण
2 “काही नको फक्त अभिनय सोड”; सोनमच्या प्रश्नावर नेटकऱ्यांचा सल्ला
3 मिस्टर बीनचे इंडियन व्हर्जन पाहिलेत का?
Just Now!
X