News Flash

‘भारत’ सोडून प्रियांकाने घेतला धाडसी निर्णय- सलमान

ही एक उत्कृष्ट आणि गमतीशीर गोष्ट आहे

सध्या बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ त्यांचा आगामी चित्रपट ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यांचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या चित्रपटात कतरिना ऐवजी प्रियांका चोप्राची निवड करण्यात आली असल्याचे सलमानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तेव्हा पासून ‘भारत’ चित्रपट चर्चेत आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’सह झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमान ‘मी प्रियांकाला टोंमणा मारत नाही. अशा चित्रपटांसाठी महिला त्यांचे पती सोडतात पण प्रियांकाने जे काही केले ते फार धक्कादायक आहे. तिने तिच्या करिअरसाठी फार मेहनत घेतली आहे. प्रियांकाला मनापासून हा चित्रपट करण्याची इच्छा होती. परंतु लग्नासाठी तिला हा चित्रपट सोडावा लागला. मी या गोष्टीची कतरिनासमोर मुद्दाम खिल्ली उडवतो. जेव्हा कतरिना चित्रपटाबाबत काही बोलते तेव्हा मी “प्रियांका धन्यवाद” असे म्हणतो आणि कतरिनाला त्याचा राग येतो. मी फक्त कतरिनासह मस्ती करत असतो’ असे सलमान म्हणाला.

‘प्रियांकाची कामगिरी प्रशंसनीय होती. मला तिने नकार दिला म्हणून राग येईल, मला हे आवडणार नाही किंवा भविष्यात मी तिच्यासोबत पून्हा काम करणार नाही हे सर्व विचार डोक्यात फिरत असताना देखील चित्रपटास नकार दिला आणि लग्नाच निर्णय घेतला. खरंतर एक प्रकारे हे योग्यच आहे. ही एक उत्कृष्ट आणि गमतीशीर गोष्ट आहे’ असे सलमान पुढे म्हणाला.

‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 3:35 pm

Web Title: salman khan talks about priyanka leaving bharat
Next Stories
1 दत्तगुरुंचा महिमा सांगणारी पौराणिक मालिका ‘श्री गुरुदेव दत्त’
2 ‘जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी घ्यावं लागायचं स्टेरॉइड ‘
3 #Super30Trailer : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा’,सामान्य गणितज्ञाची असामान्य कथा
Just Now!
X