अभिनेता सलमान खानच्या टायगर सीरिजच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आता याच फ्रँचायझी मधील तिसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सलमानने चित्रपटाच्या चित्रीकरण कोठे करायचे हे ठरवले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान टायगर ३चे चित्रीकरण सात देशांमध्ये करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दुबई, अमेरिका अशा आणखी पाच देशात चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच हा चित्रपट बॉलिवूडमधील बिग बजेट असणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण अद्यात चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सलमानच्या या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार असून खलनायकाच्या भूमिकेसाठी निर्माते कलाकाराच्या शोधत असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाचे बजेट २५० कोटी रुपये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
यापूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांच्या सांगण्यावरुन कबीर खान करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
टायगर सीरिजमधील पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. त्यानंतर टायगर सीरिजमधील दुसरा चित्रपट ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच या सीरिजमधील तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे पाहायला मिळते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 17, 2020 6:03 pm