News Flash

वाह यार! सानिया मिर्झा, कमाल करती हो! – सलमान खान

सानियाने घेतलेल्या या ठाम पवित्र्याने दबंग खान सलमान चांगलाच प्रभावित झाला आहे.

| July 26, 2014 12:00 pm

पाकिस्तानची सून म्हणून उल्लेख केल्यामुळे नाराज झालेल्या टेनिसपटू सानिया मिर्झाने कोणीही जितक्या वेळा माझा परदेशी म्हणून उल्लेख करेल तितक्या वेळा मी त्याचा निषेध करेन, या शब्दांत आपली भावना गुरुवारी व्यक्त केली. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेकजण सानियाची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले होते. सानियाने घेतलेल्या या ठाम पवित्र्याने दबंग खान सलमान चांगलाच प्रभावित झाला आहे. “वाह यार! सानिया मिर्झा, कमाल करती हो! लाईक द स्पिरीट” अशा आशयाचे ट्विट करून सलमानने सानियाचे कौतुक केले . सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीदेखील सानियाला विनाकारण या वादात ओढले जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 12:00 pm

Web Title: salman khan to sania mirza kamaal karti ho like the spirit
टॅग : Salman Khan,Sania Mirza
Next Stories
1 ईषा कोप्पिकरला कन्यारत्नाचा लाभ
2 ‘कॉमेडी नाइट्स’मध्ये सुनील ग्रोव्हरचे पुनरागमन
3 एडिटर सलमान खान!
Just Now!
X