News Flash

Tubelight Trailer Watch Video : ‘ट्युबलाइट’चा सिक्वल ‘एलईडी’ असेल, सलमानची मार्मिक टिप्पणी

चित्रपटातील भावनिक सीनसाठी डबिंग करताना माझ्या डोळ्यात अनेकवेळा पाणी आले होते.

मुंबईत एका कार्यक्रमात 'ट्युबलाइट'चा ट्रेलर लाँच करण्यात येत आहे.

‘क्या तुम्हे यकीन है….’ असं म्हणत सलमान खानच्या salman khan आगामी ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचे बरेच पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचं पोस्टर, टिझर आणि त्यामागोमाग आलेलं चित्रपटातील पहिलं गाणं पाहता सध्या ‘सब कुछ सलमान’ असंच वातावरण पाहायला मिळते आहे. भारत-चीन युद्धजन्य परिस्थितीवर बेतलेल्या या चित्रपटामध्ये १९६० च्या दशकातील काळ साकारण्यात आल्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज रात्री ९ वाजता याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सलमानने मुंबईतील एका कार्यक्रमात ‘ट्युबलाइट’चा Tubelight trailer ट्रेलर लाँच केला. यावेळी त्याचा लहान भाऊ आणि अभिनेता सोहेल खान Sohail Khan व दिग्दर्शक कबीर खान Kabir khan हेसुद्धा उपस्थित होते.

ट्रेलर लाँच दरम्यान सलमान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांचीही चित्रपटात भूमिका असल्याने चित्रपटाचे प्रोमो पाहताना नेहमी मन गहिवरून येते असे सलमानने सांगितले. तसेच, विनोद खन्ना आणि रिमा लागू यांच्या निधनामुळे आपल्या जवळचं कोणीतरी निघून गेल्याची भावना त्याने व्यक्त केली. येत्या काळात ‘ट्युबलाइट’चा सिक्वल येण्याची शक्यता सलमानच्या बोलण्यातून व्यक्त झाली. कदाचित ‘ट्युबलाइट’चा सिक्वल आल्यास तो ‘एलईडी’ म्हणून असेल, असे सलमानने म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात ‘ट्युबलाइट’चा सिक्वल पाहावयास मिळाल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको.

०६.१५ : ‘बाहुबली २’ला अभूतपूर्व यश मिळालं आहे. मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही. प्रत्येक चित्रपटाच नशीब असतं. ‘बाहुबली’ पूर्वी आम्ही ‘बजरंगी भाईजान’ प्रदर्शित केला होता. आता ‘बाहुबली २’ नंतर आम्ही ‘ट्युबलाइट’ प्रदर्शित करत आहोत. त्यामुळे, आता आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर सगळा ताण आहे. मी अजिबात ताण घेत नाही.- सलमान खान

०६.१० : ट्युबलाइटची कथा सध्याच्या काळाला साजेशी – कबीर खान

०६.०७ : चित्रपटातील व्यक्तिरेखा जितकी साधी तितकी उत्कृष्ट – सलमान खान

०६.०५ : हम आपके है कौन, बजरंगी भाईजान आणि ट्युबलाइट यांसारखे चित्रपट करणं कठीण असतं. कारण अशा भूमिकांमध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. अशा भूमिकांमध्ये तुमचे स्वतःचे व्यक्तिमत्व तुमच्या विरोधात उभं राहतं.- सलमान खान

०५.५७ : ट्युबलाइट चीनमध्येही प्रदर्शित करण्याची आमची इच्छा आहे. तिथे चित्रपट प्रदर्शित करण्याची एक प्रक्रिया आहे. ती कशी पूर्ण करता येईल हे बघूच. – कबीर खान

०५.५५ : व्यक्तिरेखेचा साधेपणा जपणे हेच ‘ट्युबलाइट’सारख्या चित्रपटामध्ये अत्यंत महत्त्वाचे – सलमान खान

०५.५२ : आम्ही कदाचित ‘ट्युबलाइट’चा सिक्वल म्हणून ‘एलईडी’ काढू, सलमानची मार्मिक टिप्पणी

०५. ५० : ट्युबलाइटची निर्मिती माझ्यासाठी आणखी एक शिकण्याची प्रक्रिया होती. मी या काळात खूप काही शिकलो. सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. – सोहेल खान

०५.५० : विनोद खन्ना, रिमा लागू यांच्या निधनामुळे माझ्या जवळचं कोणीतरी निघून गेल्याची भावना मनात आहे – सलमान खान

०५.४८ : ट्युबलाइटमध्येही मी आणि सोहेल एकमेकांच्या भावाची भूमिका साकारत आहोत. चित्रपटातील भावनिक सीनसाठी डबिंग करताना माझ्या डोळ्यात अनेकवेळा पाणी आले होते. – सलमान खान

०५.४६ : चित्रपटातील डान्स स्टेप्स खूप सोप्या असल्या पाहिजेत. जेणे करून लहान मुलंही ते करू शकतील – सलमान खान

०५.४५ : सोहेल खान आणि सलमान खान यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कॅमेऱ्यासमोर काम केले आहे. दिग्दर्शक कबीर खान यांनी युद्धजन्य परिस्थितीवरील सुंदर कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे.

०५.४२ : संगीतकार प्रीतमही ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित

०५.४२ : माझी आई सलमानसाठी प्रार्थना करायला असताना त्याला इतर कोणाच्याही प्रार्थनांची गरज नाही- सोहेल खान

०५.३९ : प्रत्यक्ष आयुष्यातील केमिस्ट्री आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला. – सोहेल खान

०५.३९ : ट्युबलाइटसाठी आम्ही चित्रिकरणानंतर संकलन करत असताना डोळ्यातून पाणी येण्याचे प्रसंग अनेकदा उदभवले. – सलमान खान

०५.३५ : एका लहानग्याकडून ट्युबलाइटची कल्पना पुढे आणि नंतर आम्ही यावर सविस्तर चर्चा केली- सलमान खान

०५.३२ :  मी जेव्हा जेव्हा ओम पुरींना ट्युबलाइटच्या प्रोमोमध्ये बघतो तेव्हा माझं हृदय तीळ तीळ तुटतं- सलमान खान

०५.३० : माझ्यासाठी पुरस्कारांपेक्षा प्रेक्षकांनी केलेलं कौतुक जास्त महत्त्वाचं- सलमान खान

०५.२५ : ट्युबलाइटच्या सूत्रसंचालनाची धुरा आरजे सुरेनने सांभाळली.

०५.२३ : एक था टायगर, बजरंगी भाईजाननंतर सलमान आणि कबीर खान तिसऱ्यांदा एकत्र आले आहेत.

०५.२० : ट्युबलाइटच्या ट्रेलर लाँचला भाईजान सलमान खान, सोहेल खान आणि दिग्दर्शक कबीर खानची उपस्थिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 5:28 pm

Web Title: salman khan tubelight trailer launch live updates watch video
Next Stories
1 Tubelight trailer Watch Video : जाणून घ्या ‘ट्युबलाइट’चा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल, कुठे बघता येईल?
2 ‘तो माणूस नव्हे हैवान होता’
3 एसएस राजामौलीच्या चित्रपटाची कथा चोरल्याचा ‘राबता’वर आरोप
Just Now!
X