News Flash

सलमानने सुष्मिताच्या वेब सीरिजवर केले ट्विट, सोशल मीडियावर झाला ट्रोल

नेटकऱ्यांनी सलमानला चांगलेच सुनावले आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. सुष्मिताने या सीरिजमधून कम बॅक केला. तसेच या सीरिजमध्ये सुष्मिताने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा थोडी वेगळी भूमिका साकारली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ट्विट करत सुष्मिताची प्रशंसा केली आहे. पण त्याच्या या ट्विटनंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

सलमानने ट्विटमध्ये ५५ सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लोकांना ही सीरिज पाहण्यासाठी आवाहन केले आहे. ‘आर्याचे स्वागत तर करा… एकमद वेगळ्या प्रकारे कमबॅक केला आहे आणि शो देखील वेगळा आहे. सुष्मिता सेन तुझे अभिनंदन’ असे सलमानने ट्विटमध्ये म्हटले आहे.

पण नेटकऱ्यांना सलमानचे हे ट्विट करणे आवडले नाही. त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी सलमानला ट्रोल करत चांगलेच सुनावले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे चित्रपट निर्माता करण जोहर, आलिया भट्ट, एकता कपूर, सलमान खान यांच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 9:10 am

Web Title: salman khan tweets about sushmita sens web series aarya gets trolled avb 95
Next Stories
1 ‘रसिकप्रेम हाच पुरस्कार’
2 नाटक..? आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर?
3 स्थितिशील स्पर्धेत सुशांत..
Just Now!
X