बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने सोमवारी त्याच्या बहुप्रतिक्षीत ‘सुलतान’ चित्रपटाचे पहिला पोस्टर प्रदर्शित केले आहे. सलमानने आपल्या ट्विटर हॅण्डलवर सुलतानचे पोस्टर ट्विटर केले. ‘सुलतान का पेहेला दाव #SultanPoster’, या मथळ्यासह सलमानने पोस्टर ट्विट केला. पोस्टरमध्ये सलमान कुस्ती खेळतानाच्या आवेशात दाखविण्यात आला आहे.

चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बासने देखील पोस्टर शेअर केले आहे. १४ एप्रिलला ‘सुलतान’चा ट्रेलर प्रदर्शित होणार असून, येत्या ईदमध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे.