News Flash

बॉडीगार्ड शेराच्या मुलाचंही बॉलिवूडमध्ये करिअर घडवणार सलमान

गुरमित सिंग उर्फ शेरा गेल्या ३० वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे. शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचं सलमाननं ठरवलं आहे.

गुरमित सिंग उर्फ शेरा गेल्या ३० वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे.

सलमान खानला बॉलिवूडमध्ये ‘भाईजान’ म्हणून ओळखलं जातं. या ‘भाईजान’चा एखाद्या नवोदित कलाकारावर वरदहस्त असला की बॉलिवूडमध्ये त्याच्या प्रवेशाचा मार्ग निश्चित झालाच म्हणून समजा. तेव्हा अनेक कलाकारांसाठी सलमान ‘भाईजान’पेक्षा ‘गॉडफादर’ अधिक आहे. सलमानमुळे बॉलिवूडमध्ये कित्येकांची करिअर मार्गी लागली आहे. कतरिना, डेझी, जॅकलिन, बॉबी देओल, सोनाक्षी सिन्हा अशी अनेक नावं घेता येतील. तर आता सलमान आपला बॉ़डीगार्ड शेराच्या मुलाचंही करिअर घडवण्याच्या तयारीत आहेत.

गुरमित सिंग उर्फ शेरा गेल्या ३० वर्षांपासून सलमानचा बॉडीगार्ड आहे. सलमानसाठी जीवही धोक्यात घालायला शेरा तयार असतो. म्हणूनच या उपकाराची परतफेड करत शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याचं सलमाननं ठरवलं असल्याचं खात्रीलायक सुत्रांकडून समजत आहे. ‘हा मोठा झाल्यावर हिरो बनेल आणि मी त्याला हिरो बनवेल’ असं आश्वासनं सलमाननं टायगरच्या जन्मावेळी शेराला दिलं होतं.

‘बॉलिवूड हंगामा’च्या माहितीनुसार आता सलमान टायगरला लाँच करण्यासाठी एका चित्रपटाच्या शोधात आहे. अर्थात या चित्रपटात टायगर मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी शेराही उत्सुक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:03 pm

Web Title: salman khan will soon launch his faithful bodyguard shera son in bollywood
Next Stories
1 Gul Makai motion poster: मलालाची कहाणी मोठ्या पडद्यावर
2 प्लास्टिकबंदी: दंडवसुलीवर आधारित ‘कॅरी ऑन! व्हिडिओ’ व्हायरल
3 मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्री किम शर्माविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X