News Flash

सलमान राहतं घर सोडणार?

सलमान खानने वांद्याच्या लिंकिंग रोडवर एक इमारत खरेदी केली आहे

बॉलिवूड अभिनेता सलमान खान

सलमान खान हे बॉलिवूडमधलं वजनदार नाव. त्याचा सिनेमा आला आणि तो बॉक्स ऑफिसवर गाजला नाही असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत नाही. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमानचे नावही समाविष्ट आहे. एवढे असूनही सलमान त्याच्या वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेन्टमध्येच राहत होता. पण आता अशी बातमी येत आहे की तो आता इथे राहणार नाही.
खरंतर गॅलेक्सी अपार्टमेन्ट इथे सलमानचे बाबा सलीम खान पहिल्यापासून राहत होते. सलीम आजही आपल्या पत्नी आणि सलमानबरोबर इथेच राहतात. काही वर्षांपर्यंत सलमानचे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल गॅलेक्सी अपार्टमेन्टमध्ये राहत होते. पण आता ते या अपार्टमेन्टच्याच बाजूला असलेल्या अपार्टमेन्टमध्ये राहतात.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने वांद्याच्या लिंकिंग रोडवर एक इमारत खरेदी केली आहे. या इमारतीचं नाव लिटिल स्टार आहे. सलमान लवकरच लिटिल स्टारमध्ये राहायला जाण्याची शक्यता आहे. सध्या लिटिल स्टारमध्ये पूर्नविकासाचे काम सुरु आहे. यानंतर इंटेरिअरचेही काम सुरु होईल. त्यानंतर सलमान आपल्या आई- वडिलांबरोबर याठिकाणी राहायला जाणार आहे. लिटिल स्टारमध्ये राहायला गेले तरी सलीम खान गॅलेक्सी अपार्टमेन्ट विकणार नाही. कारण या घराच्या त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.

असे असले तरी सलमान किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही गॅलेक्सी सोडणार असल्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान या वर्षी त्याची प्रेयसी लुलिया वंतूरसोबत लग्न करणार आहे. यामुळे त्यांना एका मोठ्या घराची गरज आहे. म्हणून ते गॅलेक्सी सोडून लिटिल स्टारमध्ये राहायला जाणार आहे. सलमान नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. आनंदाची बाब म्हणजे यावेळी सलमान आणि त्याच्या कुटुंबियांकडून लग्नाबद्दलच्या चर्चाना नाकारलेही जात नाहीए.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 3:50 pm

Web Title: salman khan will soon move out of galaxy apartments and shift into a new house
Next Stories
1 ..आलियासोबत काम करण्यास या अभिनेत्याचा स्पष्ट नकार
2 श्रीदेवी तिच्या मुलीला ठेवतेय प्रसारमाध्यमांपासून दूर..
3 म्हणून रेखा आणि अमिताभ यांनी एकत्र काम करणं बंद केलं
Just Now!
X