03 December 2020

News Flash

बॉलिवूडचा ‘टायगर’ आजची रात्र जेलमध्ये काढणार

सलमान खानला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. सलमानला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे.

वीस वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या सलमान खानला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले आहे. सलमानच्या जामीन अर्जावर उद्या जोधपूर सत्र न्यायालयाने सुनावणी होणार आहे. त्यामुळे सलमानला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. सलमानला मध्यवर्ती कारागृहाच्या बराक नंबर दोनमध्ये ठेवण्यात आले आहे. बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले आसाराम बापूही याच तुरुंगात आहेत. त्यांना सुद्धा त्याच बराकमध्ये ठेवण्यात आले आहे.

सलमानला धमकी देणारा गँगस्टरही त्याच तुरुंगात !
सलमान ज्या तुरुंगात आहे तिथे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई देखील आहे. जानेवारी महिन्यात लॉरेन्सनं त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. लॉरेन्स बिष्णोई समाजाचा आहे. या समाजात काळवीटाची पूजा केली जाते. काळवीट शिकार प्रकरणात त्याने सलमानला जानेवारी महिन्यातच जीवे मारण्याची धमकी दिली होती. जोधपूर न्यायालयाच्या परिसरातच त्यानं खुलेआम ही धमकी दिली होती. पण, सलमाननं मात्र लॉरेन्सच्या धमक्यांना भीक घातली नव्हती. खुनं, धमक्या यासारख्या अनेक आरोपांमध्ये दोषी आढळल्यानं लॉरेन्स सध्या तुरुंगाची हवा खात आहे. याच तुरुंगात सलमानला एक रात्र काढावी लागणार असल्यानं सलमानच्या जीवाला धोका पोहोचणार नाही याची काळजी पोलीस घेत आहे.

न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि १० हजारांचा दंड सुनावला आहे. सलमान खानला न्यायालयाने शिक्षा सुनावताच जोधपूर कोर्टाबाहेर ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. बिष्णोई समाजाकडून ही घोषणाबाजी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 5:17 pm

Web Title: salman khan will spend night at jail
टॅग Salman Khan
Next Stories
1 सलमानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टरही त्याच तुरुंगात !
2 सलमानला न्याय मिळाला नाही, नीलमच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
3 ‘या’ देशात तब्बल ३५ वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा होणार सुरू
Just Now!
X